Saturday, January 4, 2020

marathi love poem.. तुझ्या प्रेमात हरवून गेलेयं....

तुझ्या प्रेमात हरवून गेलेयं....


खूप ऊन लागतयं बाहेर..
पण मी मात्र चिंब भिजून गेलेयं...
तु काही जादू तर नाही ना केलीस..??
कि मी तुझ्या प्रेमात हरवून गेलेयं...??
तू नेहमीचं सोबत असतोस ...
तू नसतानाही मी तुला कायम पाहिलेयं...
हा मला भास होतोय...???
कि मी तुझ्या प्रेमात हरवून गेलेयं...??
हा माझा वेडेपणा म्हण किंवा आणखी काही...
मी आता समजून गेलेयं....
तू काहीही म्हण पण मी तुझ्या प्रेमात हरवून गेलेयं....

#marathi love poem ..#तु सोबत असताना....

          तु सोबत असताना....


तु सोबत असताना कशाचही भान नसतं
काहीही झालं तरी सगळचं कस छान असतं....
काहीच सांगायला नको तुला सगळं कस आपोआप कळतं...
माझ्याही नकळत मन माझं तुझ्यामागे वळतं...
नाजूकसं हसणं नाही..हळूहळू बोलणं नाही...
कोण काय म्हणेल याचं भान नसतं...
तु सोबत असताना सगळचं कस छान असतं....
मला हवं तस वागणं...मला हव ते करणं...
अगदी मोकळं रान असतं....
तु सोबत असताना सगळचं कस छान असतं....
ना कशाची चिंता ...ना कुणाची भीती...ना कसली तमा...
सगळं ठिक करायला तु आहेस हे माहित असतं....
कारण तुझ्यासोबत असताना सगळचं कसं छान असतं...

हरले नाहीय...marathi motivational poem...

हरले नाहीय...marathi motivational poem...

आज थांबलेय मी...पण मी हरले नाहीय....
वाट बघतेय चांगली वेळ येण्याची...
कदाचित माझी वेळ चांगली नाहीय....
मनातल्या मनात धुमसतेय आग...पण मी विझले नाहीय...
वाटा बदलाव्या लागतायतं माझ्या.....
पण माझं ध्येय बदललं नाहीय...
उठेन मी पुन्हा नव्या जोमाने...मिळवेन सारं काही....
डोळे उघडे असले तरी मी स्वप्न पाहायचं सोडलं नाहीय.....
आज सगळे हसतायतं माझ्यावर...हिणवतायतं मला..
शांत आहे कारण उत्तर देणं सोडलयं...
अजून मी जगणं सोडलं नाहीयं....

Tu..marathi love poem

तू...

तु अगदी समुद्राच्या लाटांसारखा
अचानक आलास अनं भिजवून गेलास....
मी स्वतःला हरवून बसले...
फक्त तुच उरून गेलास...
तुझ्यासोबत चालताना कळलचं नाही
किती दूर आलो आपण...
चालता चालता जगण्याचा
अर्थ नवा तू सांगून गेलास...
आयुष्यचं बदलवून माझं तू
जगणं मला शिकवून गेलास...


 
प्रत्येक क्षण मी जगताना
फक्त तुझी साथ मिळावी...
वाटतं तुझ्या डोळ्यांनी
हेच मला तु सांगून गेलास...
तुझा विचार करता करता ...
नकळत डायरीत उतरून गेलास...






आईची माया marathi story on mom

आईची माया
स्वयंपाकघरात माई कांदेपोहे फोडणीला घालत होत्या. पोह्यांचा  वास घरभर दरवळत होता. अण्णांना तर कधी एकदा ते गरमागरम पोहे खातो असे झाले होते. अण्णांना पोहे आवडतात म्हणून माईने मुद्दामचं आज पोहे केले होते. अचानक तिचे समोरच्या खिडकीतून बाहेर लक्ष गेले. एक तरुण मुलगा फणसाच्या झाडाकडे उभा होता. तिने गँस बंद केला आणि मागील दरवाजा उघडून बाहेर गेली.
माई - कोण रे तु बाबा? काय शोधतोयस?
एव्हाना तिचा आवाज ऐकून अण्णादेखील मागे आले होते.
अण्णा - या आधी तुला इकडे कधी बघितले नाही काही काम होते का?
आपल्याच धुंदीत असलेला तो माईच्या आवाजाने दचकला होता पण चेहऱ्यावर मात्र त्याने ते अजिबात येऊ दिले नव्हते. लगेचच त्याने स्वतःला सावरले व म्हणाला,
"अ..मी इकडेच राहतो बाजूच्या इमारतीत ...जाताना मला मांजर दिसलं म्हणून मी पुढे आलो...मी येतो.."
"तुला मांजरं आवडतात वाटतं..." अण्णा म्हणाले पण अण्णांचं ऐकायला तो होताच कुठे? तो तर केव्हाच दिसेनासा झाला होता..
माई - काय विचित्र बाई पोरगा ..असो..चला आपण पोहे खाऊन घेऊया उगाच थंड नको व्हायला.
अण्णा - गरमागरम चहा व पोहे खाण्यात जी मजा आहे ना ती कशातच नाही ..खरं की नाही ?
माई अगदी खुशीत हसल्या...असच हसत खेळत नाश्ता झाला आणि जरा वेळाने माई दुपारच्या जेवणाच्या तयारीला लागल्या. आज मस्त वरण-भात व वांग्याचे भरीत करायचा त्यांचा बेत होता. त्यांनी डाळ भिजत घातली आणि भरीताच्या तयारीला लागल्या. नारळ फोडलेला नव्हता म्हणून त्यांनी अण्णांना हाक मारली, "अहो,जरा मला एक नारळ फोडून देता का?"
अण्णा-आलो ..आलो..एक मिनिट हां...
अण्णांनी हातातले वर्तमानपत्र तसेच टेबलावर ठेवले व ते स्वयंपाकघरात आले. त्यांनी ओट्याखालचा कोयता व नारळ घेतला व मागचा दरवाजा उघडून ते पायरीवळ नारळ फोडायला बसले. तेवढ्यात माई बडबडतच अण्णांच्या मागून आल्या .."किती वेळा सांगायचं हो तुम्हाला नारळ फोडताना एखादं भांड घेत जा म्हणून ...पायरीवर सगळा चिखल होतो ना आणि मग तो चिखल सगल्या घरभर करता तुम्ही...",असं म्हणत त्यांनी हातातलं भांड पायरीवर आपटलं.
अण्णा- अगं..कशाला चिडतेस एवढी ..आता वय झालं विसरायला होतं..काय करणार त्याला..
हे त्यांच रोजचचं होतं..वयाची सत्तरी ओलांडली होती अण्णांनी ..त्यांना आता माईच्या रागाची सवय झाली होती अन् माईंना अण्णांच्या विसराळूपणाची...
अचानक झाडांतून मांजराच्या पिल्लाचा आवाज यायला लागला.अण्णा व माई आवाजाच्या दिशेने गेले... पाहतात तर काय..? एक चपलाच्या बॉक्सभोवती २-३ कावळे घिरट्या घालत होते.अण्णांनी त्या कावळ्यांना हाकललं आणि पुढे जाऊन पाहतात तो काय ? एक नुकतच जन्मलेलं मांजराचं पिल्लू जिवाच्या आकांताने ओरडत होतं.
माई - अहो, हात लावू नका बर त्याला.. त्याची आई शोधत येईल आणि मांजराला माणसाचा वास आला तर ते जवळ घेत नाही आपल्या पिल्लांना अस म्हणतात..
अण्णा - अगं होsss...पण कोणी सोडलं असेल ग इकडे या पिल्लाला? नुकतचं जन्मलेलं बाळ ते..असं आईपासून लांब करायला मन तरी कसं धजावतं या लोकांचं..?
माई - मला तर वाटतं तो मगाशी मुलगा आलेला ना त्यानेचं सोडलं असणार पिल्लाला...काय रे देवा..आजकाल माणूसकी हा प्रकारचं नाही उरला या जगात..डोळे पण नाही उघडलेत त्याचे...बापड्याला आपल्या आईला पण बघता नाही आलं ... माईंचा जीव गलबलला ..शेवटी त्या पण एक आई होत्या..
मुलीचं लग्न झाल्यापासून त्या खूपचं हळव्या झाल्या होत्या..
अण्णांनी त्या पिल्लाला घरात घेतले व धावत जाऊन एक जूना कपडा ते घरातून घेऊन आले.
माई मात्र अजून तिथेच उभी होती. अण्णांच्या हाकेने ती भानावर आली.."अगं इकडे ये ..मदत कर मला..तिथे काय उभी राहिलीयसं..? काय झालं? कसला विचार करतेयसं? तुला आवडलं नाही का मी मांजराला घरात आणलेलं..? अगं एवढासा जीव तो कुठे उन्हात ठेवणार त्याला..कावळे मारून टाकतील बिचाऱ्याला..." अण्णांची बडबड चालूच होती.
माई- नाही हो तुमच्यावर कशाला रागावेन..? तुम्ही योग्य तेच केलात.. कशी एक एक माणसं असतात ना ..? बिचारं मांजर शोधत असेल आपल्या पिल्लाला..थांबा दुध आणते पेल्यातून त्याला भूक लागलीय वाटतं...चमच्याने हळूहळू भरवूया त्याला भूक लागली असेल..
माईने दुधाचा पेला अण्णांकडे दिला व ती चमच्याने त्या पिल्लाला दुध भरवू लागली. निम्मे दुध खालीच सांडत होते.त्या नवजात पिल्लाला सवय नसल्या कारणाने दुध नीट प्यायला जमत नव्हते.थोडा पोटाला आधार मिळताच ते शांत झोपले.
अण्णा-तो मुलगा इथला वाटत नव्हता. कुठे लांबचा असला तर ते मांजर कस गं शोधणार आपल्या पिल्लाला अन् आईशिवाय कस जगणार हे पिल्लू..?मला काहीच कळत नाहीय काय करणार...?
माई-अहो, त्या पिल्लाला आपली मनी जवळ घेईल काय? तिच्या पिल्लांमधे याला सोडून तर बघुया..
अण्णा गप्पच होते. त्यांना माहित होतं मनी त्या पिल्लाला जवळ नाही घेणार पण माईला बर वाटावं म्हणून त्यांनी मनीला आणून त्या पिल्लाकडे सोडलं. मनीने त्या पिल्लाकडे पाहिलं. त्याचा वास घेतल्यासारखं काहितरी केलं अन् मान वळवून निघून गेली. माईंनी पटकन तिला आपल्या हातात घेतलं अन् त्या मनीची समजूत घालू लागल्या..."मनी माझी बाय ती .....घे त्या पिल्लाला जवळ ..ऐक ना माझं.." असं म्हणत परत मनीला त्यांनी पिल्लाकडे सोडलं. पण मनीला त्यांच बोलणं कळलचं कुठे होतं..???  ती तशीच निघून गेली. माई मात्र विचारात पडल्या आता कसं जगणार हे पिल्लू..???
पण अण्णांनी मात्र अजून हार मानली नव्हती. त्यांनी मनात पक्कं केलं होतं, काहीही झालं तरी या पिल्लाला आपण वाचवायचं....
त्यांनी संध्याकाळी बाजारात जाऊन इंजेक्शन ची सिरींज, ड्रॉपर,दुधाची पिशवी असं खरेदी केलं.घरी येताचं पहिले ते पिल्लाला बघायला गेले अन् पाहतात तर काय पिल्लू खोक्यामध्ये नव्हतं.त्यांनी आजूबाजूला शोधलं...पुर्ण खोली शोधून पालथी घातली पण पिल्लाचा कुठेचं पत्ता नव्हता. त्यांचा जीव घाबराघुबरा झाला..ते तसेचं हॉलमधे मालिका बघत असलेल्या माईसमोर जाऊन उभे राहिले..."अगं, खोक्यातलं पिल्लू कुठेयं...?"
माई- कुठे आहे म्हणजे..? तिथे खोक्यात आणि कुठे...? तुम्ही बाजूला रहा हो मला मालिका बघायचीय..कशाला मधे उभे आहात..?
अण्णा- बघितलं सगळीकडे...खोका काय पुरी खोली पालथी घातली...तो काळा बोका तर नाही आला ना घरात ..? तो पिल्लं खातो म्हणे....
माई त्या विचारानेचं घाबरून उठल्या..."नाही हो काहितरीचं काय दरवाजा बंद आहे...कुठेयं वाट त्याला घरात यायला...
चला आपण मिळून शोधुया असणार इथेचं कुठेतरी..."
त्या दोघांनी मिळून अख्खं घर पालथ घातलं.पण पिल्लू मात्र नाही.. शेवटी निराश,हताश,थकलेल्या चेहऱ्याने ते दोघेही येऊन सोफ्यावर बसले...
अण्णा- कसं असेलं काय माहित पिल्लू...?जिवंत तरी असेलं का काय माहित..? तो काळा बोका दिसला ना मला तर त्याला सोडणार नाही बघ...कसं फटकावतो बघ त्याला मी...बिच्चारं माझं पिल्लू गं...ते बघ मी दुध घेऊन आलेलो त्याचासाठी.... काय करणार आता....तुच बघ रे देवा आता....
अण्णांचा जीव हळहळत होता...माई पण उदास झाली होती...
माई पाणी पिण्यासाठी म्हणून स्वयंपाकघरात गेली..पाणी पिण्यासाठी मान वर केली एवढ्यात तिच्या लक्षात आलं...पटकन पाणी पिऊन ती बाहेर आली ...
माई- अहो, आपण सगळं घर शोधलं पण माळ्यावर नाही बघितलं...
अण्णा- अरे हो माझ्या लक्षातचं आलं नाही बघ....
असं म्हणतचं अण्णा जिना चढून माळ्यावर गेले...माई त्यांच्या मागोमाग होतीचं...त्यांनी आजूबाजूला नजर फिरवली पण पिल्लू काही दिसेना...समोरचं मनीचा खोका होता त्यात ती आपल्या पिल्लांना दुध पाजत होती..ते बघून अण्णा माईला म्हणाले..."अगं,कदाचित त्याची आई त्याला घेऊन गेली नसेल ना..?"
माई हसल्या व म्हणाल्या,"
ळेना ...ते गोंधळून माईकडे व खोक्याकडे पाहू लागले...त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव हळूहळू बदलत होते....त्यांना झालेला आनंद स्पष्ट दिसत होता...
मनीच्या कुशीत त्यांना दोन नव्हे तीन पिल्लं दिसत होती...


पायवाट in marathi childhood memory

पायवाट 

आज जुने फोटो बघता बघता अचानक मी थांबले. घरासमोरुन जाणारी ही पायवाट आज मला थेट माझ्या बालपणात घेऊन गेली.
बालपण म्हणजे एक पहाटे पडलेलं गोड स्वप्नचं जणू.....कशाची भीती नाही कशाचीच पर्वा नाही ... आईच्या हातचं जेवण, आईच्या कुशीतली गाढ झोप आणि झोपेत देखील आपल्या इवल्याशा ओठांवरचं गोड हसणं...
आजच्या धावपळीच्या जगात सगळचं हरवत चाललयं हे मात्र खरं.....
सकाळ सुरु व्हायची ती आईच्या हाकेने...तेव्हा कुठे आतासारखा अलार्म होता..? आई अगदी ७ वाजताच ९ वाजले असं सांगून उठवून घालायची. मग पटापट आवराआवर करुन आईच्या बाजूला चुलीकडे जाऊन बसायचे. गरमागरम घावणे व चहा पिण्याची मजाच काही वेगळी होती.... चहा-नाश्ता होताचं पाठीला दप्तर लावून आजूबाजूच्या मित्र-मैत्रिणींसोबत शाळेत जायला बाहेर पडायचे. मग रस्त्यावरील एखादा दगड पायाने उडवत उडवत  आम्ही केव्हा शाळेत पोहोचायचो कळायचे देखील नाही....
शाळेची घंटा होताच आलाप घेत घेत प्रार्थना म्हणायची व आपापल्या वर्गात जाऊन बसायचे...वर्गात अभ्यासापेक्षा जास्त लक्ष असायचे ते भिंतीवरच्या घड्याळावर ... कधी एकदा एक वाजतो आणि जेवणाची सुट्टी होते असे वाटायचे.. जेवणाची घंटा झाली की सुसाट घरी पळत सुटायचे. घरात पाऊल पडताचं आई ताट वाढायला घ्यायची. हात-पाय धुवेपर्यंत ताटात जेवण वाढलेलं असायचं. बटाट्याच्या कापांचा खमंग वास घरभर पसरलेला असायचा.गरमागरम वरणभात खाऊन मन शांत व्हायचं.मग भरभर पाय उचलत परत शाळा गाठायची. कसाबसा उरलेला दिवस जायचा आणि ५ वाजता शाळा सुटायची. शाळेतून घरी गेल्यावर हात पाय धुणे , कपडे बदलणे,चहा पिऊन झाला की सायकल घेऊन बाहेर फिरायला जाणे हा रोज संध्याकाळचा कार्यक्रम असायचा. मावळणारा सुर्य बघत बघत सायकल चालवण्यात खूप मजा यायची...
रविवार माझा आवडीचा दिवस कारण त्या दिवशी शाळेला सुट्टी असायची. उशिरापर्यंत झोपायला मिळायचं,अभ्यास नसायचा आणि सगळ्यात भारी म्हणजे रविवारचे घरात मासे असायचे. आई मासे साफ करेपर्यंत मला तिथे हातात काठी घेऊन उभे करायची. ते काम मी अगदी चोख पार पाडायचे. एकाही मांजराला मी आईच्या (खरे तर माशांच्या☺️) आसपास देखील फिरकू द्यायचे नाही. जेवताना आईने काटा काढून दिलेला मासा खायला जाम मजा यायची.
तेव्हा प्रत्येक गोष्ट आईपासून सुरु होऊन आईपाशी संपायची. अन् आज प्रत्येक गोष्ट पैशात मोजली जाते. तेव्हा बाजारात जाताना आईने दिलेली १० रुपयाची नोटसुद्धा लाखमोलाची वाटायची अन् आज लाखभर रुपये पगार घेणारादेखील म्हाताऱ्या आईला सांभाळताना पैसे कमी पडतात म्हणून रडतो.
जग बदलतयं तशी माणसं बदलतायतं. माणूसकीची जागा आता पैशाने घेतलीयं. बालपण हरवलं तसतसं सगळचं हरवलं. आपणदेखील या जगाच्या रगाड्यात ओढले गेलो.
पण कधीकधी मागे वळून पाहताना मन भरुन येते.....
काही आठवणी डोळ्यांच्या कडा भिजवून जातात............. अन् सारं बालपण एका क्षणात डोळ्यासमोर उलगडवून जातात..........😊😢